महाराष्ट्र

माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग मनोरंजनासाठी न करता ज्ञानाच्या कक्षा विस्तारितेसाठी करावा : ज्येष्ठ विचारवंत डॉ उदय निरगुडकर

भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी, सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत @ २०४७ या विषयावरील व्याख्यान

जागतिक पातळीवरील गुणवत्ता हीच भविष्यात महत्वाची ठरेल.माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी
न करता ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करण्यासाठी करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, माजी संपादक डॉ
उदय निरगुडकर यांनी केले.

भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी व सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत @ २०४७ या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
डॉ उदय निरगुडकर म्हणाले की,
उत्तम शिक्षण संस्था,उत्तम शिक्षक वर्ग व उत्तम वाचनालये चांगली माणसे घडवितील.जे आयुष्यात जिंकतात ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात.
मोह टाळता आल पाहिजे जे करायला नको ते जो शिकवितो तोच खरा शिक्षक.काहीतरी नवीन करण्याची ठिणगी प्रत्येकामध्ये असते पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.प्रत्येकाच्या मनात असणारी स्वप्ने
उत्तम शिक्षक निर्माण झाले नाहीत तर उत्तम विद्यार्थी निर्माण होऊ शकत नाहीत.उत्तम शिक्षकच २०४७ चा उत्तम भारत घडवू शकतील.जातीविरहित,कर्म विरहित समाज निर्माण करण्यासाठी हलकी समजली जाणारी स्वतःची कामे स्वतः करायला शिका.
संपूर्ण भारताकडे जगाची फॅक्टरी म्हणून बघितले जात आहे.

विश्वास चितळे म्हणाले की,माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान वाढविण्यासाठी आमचे विद्यार्थी प्रयत्न करतील.

भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी व सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत @ २०४७ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते
अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.
भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.सुनिल वाळवेकर यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस पंच्याहत्तर हजार रुपये देणगी दिली.संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी या देणगीचा स्विकार केला.
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे,सौ. लीना चितळे
संस्थेचे विश्वस्त डॉ.सुहास जोशी,संचालक जयंत केळकर, डॉ.सुनिल वाळवेकर,संजय कदम,माजी संचालक भू.ना.मगदूम, रमेश आरवाडे,महावीर चौगुले,मुख्याध्यापक संजय मोरे,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी,तुषार पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत संस्था सचिव मानसिंग हाके यांनी केले.पाहुणे परिचय डॉ.दीपक देशपांडे यांनी करून दिला.सूत्रसंचालन सुनिल भोई यांनी केले.प्रा.मनिषा पाटील यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!