महाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा

 

कोल्हापूर ः अनिल पाटील

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1.45 वाजता चांदेकरवाडी ता. राधानगरी येथे आगमन व संदिप खोत यांच्या घरी सांत्वनपर भेट. दुपारी 3 वाजता श्री छत्रपती संभाजी महाराज, विभागीय क्रीडा संकुल, रेसकोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर येथे आगमन व श्री छत्रपती संभाजी महाराज, विभागीय क्रीडा संकुल मधील स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे उद्घाटन व संरक्षक भिंत बांधकाम भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4 वाजता पुष्पा देशपांडे (राशिवडेकर) बहुउद्देशीय सभागृह 2 रा मजला देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स रविवार पेठ कोल्हापूर येथे आगमन व क्रीडा प्रतिष्ठान कोल्हापूर वर्षपुर्ती व खेळाडू सत्कार समारंभास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता चांदीनगरचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ (रजि.) हुपरी येथे आगमन व चांदीनगरचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ (रजि.) हुपरी भव्य दोन मजली शीश महल उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!