कसबा वाळवे येथे स्व. भरत आण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिर संपन्न

कोल्हापूरः अनिल पाटील
वाळवा गावचे सुपुत्र स्वर्गीय भरत अण्णा पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने कसबा. वाळवा, राधानगरी येथे भव्य आरोग्य शिबिर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
आरोग्य शिबिरास मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., उपसंचालक आरोग्य डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. पालेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, ह्लदयरोग तज्ञ डॉ. अक्षय बाफना, डॉ. मिलिंद कदम, डॉ. ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटे, डॉ. वर्धन, वाळवा गावचे सरपंच वनिता पाटील, उपसरपंच संग्राम पताडे, ग्राम पंचायत सदस्य”यूवा नेते मानसिंगदादा पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख निर्मला भांदीगरे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, राज्यामध्ये आरोग्य विभागामार्फत मोफत सर्व रोग निदान शिबिर राबवण्यात येईल. याची सुरुवात आयुष्यमान आरोग्य मंदिर वाळवा, राधानगरी येथे झाली. शासन आपल्या दारी तसेच आरोग्य सेवा आपल्या दारी अशी संकल्पना राबवण्यात येईल. यामध्ये सर्व रोग तपासणी निदान, उपचार, शस्त्रक्रीया मोफत केल्या जातील. तसेच कॅन्सर तपासणी व्हॅन उपलब्ध केली आहे. आरोग्य सेवा देण्याचे काम राज्यामध्ये वेगवेगळ्या योजनां मार्फत सरकारच्या माध्यमातुन मोफत राबवण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये मिळणा-या सर्व सुविधा या शिबिराच्या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये ईसीजी, सोनाग्राफी, एक्सरे, प्रयोगशाळा, नेत्र रोग, स्त्री रोग, क्षयरोग, कुष्ठरोग, लहान मुलांची तपासणी तसेच ज्येष्ठ नागरिकांची तपासणी पाच दिवस तज्ञ डॉक्टरांमार्फत केली जाणार असून. सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना चष्मे, श्रवण यंत्र, प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड वाटप, क्षयरोग रुग्ण निश्चय मित्र आहार किट वाटप करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना आरोग्या विषयी माहिती क्यू आर कोडचे अनावरण करण्यात आले.
या शिबिरात ह्लदयरोग तज्ञ ङाँ. अक्षय बाफना यांनी कसबा वाळवे परिसरातील पञकारांची ह्हदयाची तपासणी केली.
अशोकराव फराटे यांनी मनोगत व्यक्त केले. जयवंत पाटील यांनी आभार मानले.