विहिरीवरील मोटर सुरू करताना पाय घसरून विहिरीत पङल्याने मांगोली येथील शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूरःअनिल पाटील
मांगोली (ता.राधानगरी) येथील दत्तात्रय ईश्वरा पाटील( वय ५२) हे शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू करत असताना पाय घसरून विहिरीतील पाण्यात पडले.खोल पाण्यात बुडाल्याने ते मृत झाले. घटनेची नोंद राधानगरी पोलिसात करण्यात आली आहे
घटनास्थळ व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी,मांगोली दत्तात्रय पाटील ऊस पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू करत असताना पाय घसरून विहिरीत पडले. खोल पाण्यामध्ये बुडाल्यानं कुटुंबीयांनी त्यांना पाण्याबाहेर काढलं. यावेळी त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती. अशा अवस्थेत त्यांना सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदन करून मॄतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.याबाबतची फिर्याद पुतणे अमोल कृष्णात पाटील यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.