पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी कुंभारगाव, शिरगाव येथे साधला संवाद

पलूस : पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कुंभारगाव व शिरगाव (ता. कडेगाव) येथे भेट देऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.
डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास व आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून अनेक कामे मार्गी लावली आहेत. भविष्यकाळातही विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीकरिता येत्या २० नोव्हेंबरला अ.क्र.१ समोरचे ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करून मला पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या.
यावेळी आ. अरुण (अण्णा) लाड, युवा नेते सतीश आबा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामदैवतांचे मनोभावे दर्शन घेतले. गावातील ज्येष्ठ नागरिक व माता-भगिनींचे आशीर्वाद घेतले.