भिलवडी येथील पाटील डेअरीचे संस्थापक उद्योगपती राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
युवा नेते जितेश भैय्या कदम यांची व मान्यवरांची उपस्थिती

भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पाटील डेअरीचे संस्थापक उद्योगपती राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी युवा नेते जितेश भैय्या कदम यांनी चौफेर विषयावर भाषण केले. हे भाषण अनेकांना भावले ,तर अनेकांना प्रेरणादायी ठरले.
यावेळी पाटील डेअरी मध्ये उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आदर्श कामगार म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी भिलवडी गावचे काँग्रेसचे नेते, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील, माजी सरपंच विजय कुमार चोपडे, माजी सरपंच शहाजी भाऊ गुरव, भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे, दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासो मोहिते, उद्योजक सतीश आबा पाटील, चोपडेवाडीचे नेते रविंद्र यादव, शिवशक्ती पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत वग्यानी, पाटील डेअरी चे उद्योजक निखिल पाटील आणि विविध क्षेत्रांमधील पदाधिकारी, पत्रकार अभिजीत रांजणे, घनश्याम मोरे ,कवी सुभाष कवडे व मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन दीपक भाऊ पाटील यांनी केले.