महाराष्ट्रराजकीय

कुंडल जिल्हा परिषद गटाचे नंदनवन करणार : काँग्रेसचे जि प उमेदवार ऋषिकेश लाड

कुंडल जिल्हा परिषद गट आणि कुंडल पंचायत समिती गण, बांबवडे पंचायत समिती गण काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी पिंजून काढला

 

दर्पण न्यूज पलूस कुंडल (अभिजीत रांजणे) :-

माझे आजोबा कै. पतंगराव कदम आणि पलूस कडेगांव मतदारसंघाचे माझे मामा माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी या मतदारसंघाचा विकास साधला, यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून मी कुंडल गावचे नंदनवन करणार, असे आश्वासन कुंडल जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड यांनी दिले.

कुंडल जिल्हा परिषद गटाचे काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड यांनी “दर्पण” शी बोलताना सांगितले, की पलूस आणि कडेगाव विधानसभा मतदारसंघात माझे आजोबा कै. पतंगराव कदम साहेब यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास केला. अनेकांना रोजगार संधी दिल्या. अनेक उद्योग उभारले. त्याच धर्तीवर माझे मामा पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनीही या मतदारसंघांमध्ये विकासगंगा आणली आहे. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे नेते महेंद्र आप्पा लाड यांनीही आपले कर्तव्य बजावत विकास केला.
या सर्वांचा वारसा घेऊन मी ही कुंडल नंदनवन करणार आहे. कुंडल जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवारांना मतदार बंधू-भगिनींचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या सात फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला व माझ्या पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवारांना भरघोस अशा मताने निवडून द्या, असे आवाहनही ऋषिकेश लाड यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!