महाराष्ट्रराजकीय

भिलवडी जि प गट , पं स गणातील भाजपाच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा ; माजी जि प अध्यक्ष संग्राम देशमुख

भिलवडी -माळवाडी येथे भाजपाची बैठक : भिलवडी जि प भाजपाचे उमेदवार, भिलवडी, वसगडे प स चे उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार

 

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे):- भिलवडी जिल्हा परिषद गट , पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदान करून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी माळवाडी -भिलवडी येथील  प्रचार बैठकीत केले.

यावेळी संग्राम देशमुख यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस , भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने सांगली जिल्ह्यात विकास केला आहे. त्या जोरावर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा निश्चितपणे फडकेल.  भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 25 कोटी 12 लक्ष रक्कमेची विकास कामे केली.  दि. 07 रोजी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदान करून प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन देशमुख यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

भिलवडी माळवाडी येथे जिल्हा परिषद – पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख,  शरद भाऊ लाड , संग्राम देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या  प्रमुख उपस्थितीत  भिलवडी जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महेश रंगराव पाटील, माळवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ. सुनीता शिवाजी गायकवाड, वसगडे पंचायत समिती गणाचे  सौ. मंजुषा धोंडीराम पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने बैठक झाली.

या बैठकीला भिलवडी, माळवाडी, वसगडे आणि इतर गावांतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!