महाराष्ट्रराजकीय

काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील, हजराबी सलामत यांचा माळवाडी येथे घरोघरी प्रचार ; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रचारात भिलवडी, माळवाडी येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक यांचा मोठा सहभाग

 

 

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे) :-
काँग्रेसचे पक्षाचे जिल्हा परिषद भिलवडी गटातील उमेदवार प्रतीक पाटील, काँग्रेस पक्षाच्या भिलवडी पंचायत समिती गणातील उमेदवार हजराबी सलामत यांनी माळवाडी येथे घरोघरी प्रचार केला. या प्रचारावेळी मतदार बंधू भगिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचारासाठी भिलवडी, माळवाडी येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग होता.

भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
भिलवडी पंचायत समिती गणातील
हजराबी बालेचाँद सलामत, भिलवडी जिल्हा परिषद गटातील प्रतिक संग्राम पाटील यांनी माळवाडी येथे घरोघरी प्रचार केला. यावेळी या दोन्ही उमेदवारांनी लोकांना मतदान करण्याची मागणी केली.

माळवाडी येथे घरोघरी प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ‘हात’ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतीक पाटील आणि हजराबी सलामत यांनी मतदारांना केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!