महाराष्ट्र

बांधकाम कामगारांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध : भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांचे प्रतिपादन

 

कोल्हापूरः अनिल पाटील

बांधकाम कामगारांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून त्यांचा योग्य तो न्याय आणि त्यांना योग्य त्या योजना देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी केले .
गारगोटी येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार थंब कँम्प कार्यक्रमात ते बोलत होते .
यामध्ये 1160 कामगारांनी आपली नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.नाथाजी पाटील फाउंडेशन यांचे वतीने गारगोटी येथील अशोका मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी या कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले होते .
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील कामगार मंत्री सुरेश खाडे व खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या बांधकाम कामगारांच्या कॅम्प मध्ये सर्व बांधकाम कामगारांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपली नोंदणी करून या योजनेचा लाभ घेतला .
सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत भुदरगड तालुक्यातील ११६० बांधकाम कामगारांनी यामध्येआपला सहभाग दर्शवला .
भाजपाचे कार्यकर्ते अविनाश कवडे दीपक पाटील यांनी या कॅम्पचे आयोजन केले होते .
तर यावेळी या कार्यक्रमास प्रा.धनाजी मोरस्कर,नामदेव चौगले,भगवान शिंदे,पांडुरंग वायदंडे,रणजीत आडके,गारगोटी ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगुले, मोहन सुर्यवंशी,सचिन देसाई आदी उपस्थित होते.कॅम्प यशस्वीतेसाठी सुनील तेली,अमोल पाटील,विक्रम पवार,प्रवीण पाटील, भाऊ वाळवेकर,अशोक येलकर, सुहास मुधाळकर,लखन लोहार,मुस्तफा शेख, बाबु पिंगळे,रविराज ढेरे,स्वप्नील पाटील,गणेश पाटील,राम पाटील,अक्षय मेंगाणे, अमोल देसाई,अमोल डांगे, आकाश कवडे,प्रवीण मोरस्कर,अतुल पाटील,निशांत सुतार,आशितोष कवडे,अरुण कवडे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!