गलगले येथे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची शिवाजी कांबळे, तानाजी कांबळे यांच्या गृहप्रवेशानिमित्त सदिच्छा भेट

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :- शिवाजी कमाजी कांबळे व तानाजी कमाजी कांबळे यांच्या गलगले येथील नवीन घराच्या वास्तुशांती व गृहप्रवेश कार्यक्रम निमित्त जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच त्यांच्या नविन घरात भरभराट आणि समृद्धी नांदो अश्या सदिच्छा व्यक्त करत परिवारातील सदस्यांशी संवाद साधला .यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन कांबळे कुटुंबायांनी सत्कार केला व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांनी केला.यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे,कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कांबळे , जयवंत हळदिकर यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.