हिवताप विभागाचे हस्तांतरण करणार नाही ; सार्वजनिक आरोग्यमंञी प्रकाश आबिटकर यांची हिवताप संघटनेच्या शिष्टमंङळाला ग्वाही

कोल्हापूरः अनिल पाटील
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंञी नामदार प्रकाश आबिटकर व खासदार धैर्यशील माने यांच्या समवेत आज शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे हिवताप कर्मचार्यांनी भेट घेतली.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अरुण खरमाटे आणि हिवताप संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी हिवताप हस्तांतरण संदर्भात अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. खरमाटे यांनी हिवताप विभागाचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकङे करू नये या हस्तांतरला आपला विरोध असेल असे स्पष्ट करून राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे यांनीही आमच्या विभागाचे जिल्हा परिषदेकङे हस्तांतर केल्यास प्रशासकीय खूप मोठ्या गुंतागुंती तयार होतील आणि त्याचा फटका राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांना बसेल. यापूर्वी मी अनेक निवेदन आपल्याला या संदर्भात दिलेली आहेत त्याचे स्मरण करून हा विभाग स्वतंत्र राहावा असा हट्ट मंञी महोदयांकङे धरवला. प्रकाश आबिटकर यांनी बुधवार दिनांक 14 /5/ 25 रोजी याविषयी चर्चा करू असे सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत हिवताप विभागाचे हस्तांतरण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे स्पष्ट संकेत आरोग्य मंत्री महोदयांनी दिले आहेत.