भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांची बढती आणि साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांची भिलवडी पोलिस ठाणे येथे नियुक्ती निमित्ताने सत्कार
भिलवडी पोलिस ठाणे आणि लांडगे उद्योग समूहाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन

भिलवडी: भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांची सांगली गुन्हा अन्वेषण विभागात बढती आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांची भिलवडी पोलीस ठाणे येथे नियुक्ती यानिमित्त भिलवडी पोलिस ठाणे आणि लांडगे उद्योग समूहाच्या वतीने खंडोबाची वाडी येथे सत्कार करण्यात आला .
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सांगितले की,
कृष्णा काठावरील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावातील लोकांनी केलेले सहकार्य, दिलेले प्रेम, माया,आपुलकी, स्नेह हे मी कधीच विसरू शकणार नाही स्वतंत्रपणे पोलीस ठाणे अधिकारी म्हणून माझी कर्मभूमी ही भिलवडी पोलीस ठाणे ठरल्याने, मी भिलवडी पोलीस स्टेशनला आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असे वक्तव्य नुकतेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडे बदली होऊन गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी व्यक्त केले तर नितीन सावंत यांना केलेले सहकार्य व प्रेम माझ्यावरती ही असेच राहू दे, लोकांच्या कोणत्याही पद्धतीच्या अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. क्राइम रेट कमी करण्यावर माझा भर राहील कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा तसेच माझ्या देखील करिअर मधले हे स्वतंत्रपणे अधिकारी म्हणून पहिलेच पोलीस स्टेशन असल्याने मी माझे करिअर यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून सर्वांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी प्रयत्नशील राहीन असे मत भिलवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भगवान पालवे हे दोघेही भिलवडी पोलीस ठाणे व लांडगे उद्योगसमोर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यावेळी बोलत होते.
रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी लांडगे मंगल कार्यालय खंडोबाचीवाडी येथे भिलवडी पोलीस ठाणे व लांडगे उद्योग समूह यांच्या वतीने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे बदली होऊन गेलेले भिलवडी पोलीस ठाण्याचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने पदभार स्वीकारलेले भगवान पालवे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नितीन सावंत यांचा सत्कार नागठाणे गावचे सरपंच विजय माने,
खंडोबाचीवाडीचे उपसरपंच उत्तम जाधव,सुखवाडीचे सरपंच बाळासाहेब यादव यांच्या हस्ते करण्यात आला
तर भिलवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस महंमद लांडगे व नागठाणे गावचे माजी उपसरपंच झाकीर भैय्या लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.त्याचबरोबर साहित्यिक, पक्षीप्रेमी व पत्रकार संदीप नाझरे व जनशक्ती न्यूजचे संपादक भाऊसाहेब रूपटक्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांचाही सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व भगवान पालवे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर भिकाजी साळुंखे पाटील,सुनील जाधव उर्फ सोन्या बापू, मोहन तावदर नाना, पत्रकार घनश्याम मोरे, शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गौस महंमद लांडगे यांनी केली तर आभार साहित्यिक सुभाष कवडे यांनी मानले. सूत्रसंचालन भाऊसाहेब रूपटक्के व सुभाष कवडे यांनी केले यावेळी भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील सरपंच, पोलीस पाटील, इतर मान्यवर व्यक्ती व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत साहेब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.