कुङूत्री येथील रामचंद्र चौगुले यांना जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे राधानगरी तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

कोल्हापूरः अनिल पाटील
कुडूत्री तालूका राधानगरी) येथील पत्रकार, कलाकार, कवी, लेखक, परिक्षक, समीक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख, कै. लक्ष्मी श्रीपती चौगले चॅरिटेबल ट्रस्ट कुडूत्री, पं पु. वामनरावजी गुळवणी महाराज कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र श्रीपती चौगले यांना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात सन २०२३-२४ चा आचार्य अत्रे राधानगरी तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाला
गेली २४ वर्षे ते पत्रकारितेच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत . यापूर्वी त्यांना राष्ट्रीय पातळीवरचे पत्रकारीता, युवा, कला, सांस्कृतिक, समाजभुषण, २६ पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये राज्यशासनाचा सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राजमाता जिजाऊ सर्वोत्कृष्ट पत्रकार, दैनिक पुण्यनगरीचा ग्रामीण पत्रकारिता व अन्य पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच गौरव माय मराठीचा कसबा तारळे सांस्कृतिक कार्यक्रम, कलेश्वर सोंगी भजन, ग्रामीण तीन अंकी नाटक व चित्रपटांमध्ये अभिनय, दोन नाटक, कथा, लघुनाटीकेचे लेखन, त्यांच्या अनेक कवीता दैनिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत, कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाचे वतीने कलाकारांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी कार्यतत्पर असे चौफेर व्यासंगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले रामचंद्र चौगले याना सन्मानचिन्ह रोख रक्कम शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुधवार दि.२६ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसो मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या उपस्थितीमध्ये वितरण सोहळा पार पडणार आहे .