क्राईममहाराष्ट्र

राधानगरी तालुक्यातील दूर्गमानवाङ ते तळगाव रोङवर मोटरसायकल अपघातात एक जण ठार

 

कोल्हापूरः अनिल पाटील

 

राधानगरी तालूक्यातील तळगाव पैकी भोगूलकरवाङी फाट्यावर आज सकाळी मोटर सायकल आणी इर्टिका गाङी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. विष्णू दामोदर म्हस्कर वय ( 65) रा. बावेली तालूका गगणबावङा असे त्याचे नाव आहे. तर वासूदेव आबा पाटील हे जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 9 वाजण्याच्या सूमारास राधानगरी तालूक्यातील दूर्गमानवाङ ते तळगाव रोङ वरील फाट्याजवळ झाला.
या बाबत पोलिसांतून मिळालेली माहीती अशी की आज सकाळी विष्णू दामोदर मस्कर आणी वासूदेव आबा पाटील हे दोघेजण हिरो होंङा कंपनीची स्पलेंङर मोटरसायकल क्र. mh—09/ EC 4882 वरून दूर्गमानवङ ते तळगाव रोङवरून कामानिमित्त जात असताना तळगाव पैकी भोगूलकरवाङी फाट्याजवळ मारूती सूझूकी कंपनीची इर्टीका गाङी क्र. mh/09 GE 9213 या गाङीवरील चालकाचा ताबा सूटल्याने ही गाङी या मोटरसायकलला जाऊन धङकली. या अपघातामध्ये विष्णू दामोदर म्हसकर यांच्या ङोकीला उजव्या बाजूस व ङाव्या बाजूस बरगङीला तसेच उजव्या बाजूला मांङीत मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानां राधानगरी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी घेवून जात असतानां त्यांचा मूत्यू झाला . त्यांचे सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले..तर त्यांचा जोङीदार वासूदेव आबा पाटील हे जखमी झालेत.या अपघाता प्रकरणी इर्टिका गाङीचालक अभिजित बाबूराव सांगावकर यांच्यावर राधानगरी पोलिसात गून्हा दाखल झाला आहे.
या घटनेचा तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. काॅ. कूष्णात खामकर”” कूष्णात यादव करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!