क्राईममहाराष्ट्र
चंद्रे येथील मयंक सुतार या बालकाच्या हाताच्या बोटाला काही तरी चावल्याने सी.पी.आर रूग्णालयात दाखल

कोल्हापूरःअनिल पाटील
चंद्रे .ता. राधानगरी येथे रात्री झोपेत काही तरी हाताच्या बोटास चावल्याने मयंक संदीप सूतार( वय 11) रा. चंद्रे.ता. राधानगरी.याला सी.पी. आर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रात्री 12 वाजण्याच्या सूमारास तो झोपलेला असताना त्याच्या हाताच्या बोटाला काही तरी चावले होते. त्यानंतर त्याने ओरङाओङ केल्यानंतर त्याला त्याचा आजोबाने कसबा वाळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेवून गेले होते. त्यानंतर त्याला पूढील उपचारासाठी कोल्हापूरातील सी. पी. आर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची नोंद सी.पी. आर पोलिस चौकीत झाली आहे.