आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांनी मिरज येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे केले स्वागत

मिरज : उन्हाळी सुट्टीनंतर १५ जून पासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी, विद्यार्थीनी शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने शाळेत उपस्थित झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. 15 जून रोजी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी हजर झालेल्या विद्यार्थ्यांचे उद्योगपती मा.सी.आर.सांगलीकर साहेब यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. यावेळी सी. आर. सांगलीकर फौंडेशनचे नजीर झारी, सचिन इनामदार, किरण पाटील, संजय पाटील,काँग्रेस सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष, नरवाडचे युवा नेते श्रीनाथ देवकर,आदी मान्यवरांसह न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.