भिलवडी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

भिलवडी. :-
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते.मान्यवरांचे हस्ते ग्रंथपूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम,सण समारंभ, स्वागत समारंभ,वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू सोबतच एखादे पुस्तक भेट द्या. पुस्तका सारखी दुसरी अनमोल भेट नाही.पुस्तके भेट हा उपक्रम घराघरात राबविल्यास वाचन
वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल असे प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केले.यावेळी बोलताना प्रा. डी.बी.पाटील म्हणाले की,मुलांच्या वरती वाचन संस्कार रुजविण्यासाठी कमीत कमी दरात पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे या हेतूने अस्मिता प्रकाशनच्या वतीने ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून पुस्तके उपलब्ध करून दिली जात असून त्यास वाचकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
प्रास्ताविक व स्वागत डी.आर.कदम यांनी केले.जयंत केळकर यांनी आभार मानले.यावेळी जी.जी.पाटील,डॉ.
जयकुमार चोपडे,बाळासाहेब पाटील,तुकाराम पाटील, हकीम तांबोळी,शरद जाधव, वामन कटिकर,सौ. विद्या निकम,सौ.मयूरी नलवडे आदींसह वाचक,सभासद,ग्रंथ प्रेमी उपस्थित होते.