येळावी वसगडे पर्यंत कृष्णा कॅनॉलचे पाणी पोहोचेपर्यंत पाणी बंद करू नका : जे के (बापू) जाधव*

दर्पण न्यूज दुधोंडी प्रतिनिधी: –
दुधोंडी येथील कृष्णाकाठ उद्योग समूह तसेच मानसिंग को ऑप बँक या उद्योग समूहास चंद्रकांत पाटोळे अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ यांनी भेट दिली, या भेटीवेळी त्यांचा कृष्णाकाठ उद्योग समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला, या सत्कारास लोकनेते जे के (बापू) जाधव संस्थापक कृष्णाकाठ उद्योग समूह, उपविभागीय अभियंता कृष्णा कालवा कराड बी आर पाटील तसेच शाखाधिकारी पाटबंधारे किर्लोस्करवाडी अमोल पाटील, सुधीर भैय्या जाधव चेअरमन मानसिंग को ऑप बँक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कृष्णा कालवा हा अनेक वर्षापासून अनेक गावांना तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव तालुका या तीन तालुक्यांना एक वरदान ठरलेला आहे, अनेक शेतकरी या कृष्णा कॅनॉल वर अवलंबून आहेत पलूस व तासगाव तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक असतील द्राक्ष बागायतदार असतील तसेच अनेक हंगामी पिके घेणारी शेतकरी वर्ग आहे आणि या सर्वांची शेती कृष्णा कॅनॉलवर अवलंबून असल्याने ह्या कृष्णा कॅनॉल चा उपयोग होत आहे, त्यामुळे या
आजच्या या घडीला चालू असलेले अवर्तन कृष्णा कॅनॉल मधून पाणी वाहत आहे, तरी येळावी वसगडे या गावापर्यंत कृष्णा कॅनॉलचे पाणी पोहोच होत नाही तोपर्यंत वरून पाण्याचे आवर्तन बंद करू नये नाहीतर शेतकरी पेटून उठेल असे मनोगत कृष्णाकाठ उद्योग समूहाचे नेते जे के बापू जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी कृष्णा कॅनॉल चे आवर्तन चालू असल्याने कॅनॉलचे काही दरवाजे बंद करून ते पाणी पुढे सरकवून सगळे पाणी येळवी वसगडे पर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे, तरी शेतकऱ्यांनीही सहकार्य करण्याची गरज आहे, तरच पुढे येळावी वसगडे पर्यंत पाणी पोहोचेल, जे के बापू जाधव यांची मागणी रास्त आहे ते शेतकऱ्याचे नेत्व आहेत आणि त्यांनी सतत घेतलेल्या पाठपुराव्यामुळे कॅनाल बारमाही झाला आहे त्यांची जिद्द आणि चिकाटी तरुणाला लाजवेल अशी आहे त्यामुळे बापूना व शेतकऱ्यांना आम्ही जेवढे होईल तेवढे सहकार्य करू असे मत सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक चंद्रकांत पाटोळे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे सोशल मीडिया अध्यक्ष अक्षय सावंत, महासचिव प्रसाद शिंदे, इंजि. प्रकाश पवार, हरून मगदूम, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव तसेच गावातील इतर पदाधिकारी व मान्यवर वर्ग उपस्थित होते स्वागत प्रकाश आरबुणे यांनी केले तर आभार प्रमोद जाधव यांनी मानले.