

दर्पण न्यूज पुणे :- भारती सहकारी बॅंक अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बैठक पुणे येथे झाली. या बैठकीत अध्यक्षपदी आमदार डॉ विश्वजीत कदम यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी डॉ. सचिन वेरणेकर यांची निवड झाली. यावेळी सागर कदम आणि इतरांचीही संचालक पदी निवड करण्यात आली.
सभासदांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. स्व.डॉ. पतंगराव कदम साहेबांनी बँकेत पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीचा विचार रुजवला आहे.बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी, अधिक सक्षम व पारदर्शक कारभारासाठी तसेच ग्राहकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक शिस्त आणि विश्वासार्ह सेवा या माध्यमातून भारती सहकारी बँकेला नवी उंची मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अध्यक्ष आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.