ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसास प्रारंभ

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसानिमित्त आयोजित तीन दिवसीय ऊरूसाचे दि.11 ते 13 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दर्गाह परिसरात भक्तीचा दरबार सजणार असून, जिल्ह्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने या ऊरूसास उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दि.11 ऑगस्ट रोजी संदल मिरवणूक, दि.12 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, तर दि.13 ऑगस्ट रोजी जियारत व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यानिमित्त दि,12 ऑगस्ट रोजी कव्वालीची मैफल सजणार आहे. यात पुण्यातील परविन काचवाली आणि हैदर नाझाँ या कव्वालांच्या जुगलबंदीचा मुकाबला रंगणार आहे. या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन ऊरूस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.