कसबा वाळवे येथे जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

कोल्हापूर :- 5 जून रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर मधील कसबा वाळवे येथील मा. आमदार नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय, प्रतिभा विद्यालय आणि रघुनाथ न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे पर्यावरण संवर्धन अभियानाची आज 7 जून रोजी विविध कार्यक्रमांद्वारे सांगता करण्यात आली.
केंद्रीय संचार ब्यूरो आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कसबा वाळवे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पर्यावरण जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील म्हणाले की, आपल्या घरामध्ये तयार होणारा 70 टक्के कचरा हा विघटनशील आहे. याची विल्हेवाट लावण्याचे आपण आपल्या घरी प्रयत्न करायला हवे. यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण फार महत्वाचे आहे जेणेकरून प्रक्रियायोग्य कचरा हा कमी प्रमाणात निर्माण होईल. त्यांनी यावेळी एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आणि पर्यावरण पूरक सवयींचा अंगीकार करून वस्तूंची नासाडी टाळण्याचे आवाहन केले.
केंद्रीय संचार ब्यूरो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क।। वाळवे, ग्रामपंचायत कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभात फेरी आणि स्वच्छता मोहीम #WorldEnvironmentDay pic.twitter.com/aKtqKjwy6j
— केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र (@CBCKolhapur) June 7, 2024
या निमित्ताने वरील शाळांमध्ये आयोजित केलेल्या निबंध, रांगोळी आणि भित्तीपत्रक आदी स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
केंद्रीय संचार ब्यूरो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क।। वाळवे, ग्रामपंचायत कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करताना#WorldEnvironmentDay pic.twitter.com/1XndRvRmgt
— केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र (@CBCKolhapur) June 7, 2024
यावेळी हनुमान चौक परिसराची स्वच्छता करून तेथे स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
केंद्रीय संचार ब्यूरो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क।। वाळवे, ग्रामपंचायत कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता फलकाचे अनावरण#WorldEnvironmentDay2024 pic.twitter.com/wsiyrg3u9Y
— केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र (@CBCKolhapur) June 7, 2024
यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी प्रचार फेरी काढून परिसरातील नागरिकांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.
केंद्रीय संचार ब्यूरो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क।। वाळवे, ग्रामपंचायत कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कापडी पिशव्यांचा आग्रह धरण्याचे दुकानदारांना विद्यार्थ्यांकडून आवाहन#WorldEnvironmentDay pic.twitter.com/OMODCqhUaM
— केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट्र (@CBCKolhapur) June 7, 2024
श्रमदानातून गाव परिसराची स्वच्छता, स्वच्छता शपथ, निबंध, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन, स्वच्छता फलक निर्मिती, वृक्षारोपण, प्रभात फेरी, असे आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. यावेळी नागरिकांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह करण्यात आला.
केंद्रीय संचार ब्यूरो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क।। वाळवे, ग्रामपंचायत कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभात फेरी आणि स्वच्छता मोहीम #WorldEnvironmentDay pic.twitter.com/aKtqKjwy6j
— केंद्रीय संचार ब्यूरो, कोल्हापूर, महाराष्ट