आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सांगली येथील शासकीय रुग्णालयात एच आय व्ही सेंटरच्या सेवेची वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गौरव सोहळा उत्साहात

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती

 

सांगली :-
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय एआरटी सेंटरला व त्यांच्या सेवेस वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एन एम पी प्लस विहान काळजी व आधार केंद्र सांगली यांच्याकडून गौरव सोहळा आयोजित केला हा सोहळा दिनांक 30 मे 2024 रोजी ए आर टी सेंटर व एआरटी वीस वर्ष एआरटी उपचार घेत असलेल्या क्लायंटला भेटवस्तू देऊन व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे सिविल सर्जन विक्रम सिंग कदम डीएपीसीयू कार्यालयाचे डेपो माननीय विवेक सावंत सर ए आर टी सेंटर चे नोडल ऑफिसर माननीय भागवत सर वैद्यकीय अधिकारी कौन्सिलर स्टाफ नर्स फार्मासिस्ट डाटा मॅनेजर टेक्निशियन इतर सामाजिक संस्था आणि एआरटी उपचार घेत असलेले क्लायंट उपस्थित होते.

सध्या महाराष्ट्रात एकूण दोन लाख 40 हजार 165 एचआयव्ही संसर्गित रुग्ण एआरटी औषधोपचार घेत आहेत महाराष्ट्रात एकूण 83 एआरटी केंद्र कार्यरत असून 177 उप एआरटी केंद्र सुरू आहे आज एआरटी केंद्राद्वारे मोफत एआरटी औषधाचा लाभ घेतल्यामुळे देशांमध्ये लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे तसेच मृत्यूचे प्रमाण 77 टक्के पेक्षा कमी आहे.

या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्व उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले त्यानंतर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा माझा समारोप करण्यात आला.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!