कागल तालुक्यातील जैन्याळ येथील तलाठी प्रदीप अनंत कांबळे याला 5 हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रार यांचे मुगळी गावातील शेत जमिनीचे हक्क सोड पत्राप्रमाणे शेत जमिनीच्या डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी व नाव नोंदणी करून डायरी उतारा देण्याकरिता गणपती रघूनाथ शेळके वय 46 ( खासगी ईइसम) रा. जैन्याळ ता. कागल जि. कोल्हापूर यांनी प्रदीप आनंत कांबळे वय 32 पद तलाठी जैन्याळ वर्ग o3 ता. कागल जि. कोल्हापूर. रा. रोहीदास गल्ली मूरगूङ श्री. जगन्नाथ पूजारी यांच्या घरी भाङ्याने मूळ गाव तरसंबळे ता. राधानगरी. जिल्हा. कोल्हापूर यांनी तलाठी प्रदीप कांबळे यांच्याकरिता 5,000/- रुपये लाचेची मागणी केली तसेच खासगी ईसम गणपती शेळके यांनी तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेले 5,000/- रुपये हे लिंगनूर सर्कल यांच्याकडे तक्रारदार यांना देण्यास प्रोत्साहन दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
, पोलीस निरीक्षक बापू साळूंखे””
पोहेकॉ/ विकास माने,पोहेकॉ / श्री.सुनील घोसाळकर,
पोहेकॉ /संदीप काशीद,पोना / सचिन पाटील,
पोकॉ/ संदीप पवार.
आदींच्या पथकाने केली.