महाराष्ट्र

पुणे येथे ज्येष्ठ साहित्यिक, कवी सुभाष कवडे यांना बाबूराव शिरोळे पुरस्कार प्रदान

भिलवडी परिसरातून कवी सुभाष कवडे अभिनंदनचा वर्षाव

भिलवडी :- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या आद्य साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शांतादेवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कार नुकताच पुणे येथील एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृह येथे समारंभ पूर्वक ज्येष्ठ साहित्यिक, कवी सुभाष कवडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला.

प्रारंभी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे गीत सादर करण्यात आले परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. माधव कौशिक यावेळी म्हणाले लेखकाने समाजाच्या वेदना जाणवयाच्या असतात मूक लोकांचा आवाज लेखकाने वावयाचे असते लेखकाच्या लेखणीतून करुणा विस्तारत जावी यासाठी लेखक आणि सतत जागृत राहून आपले लेखन करावे आभार प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी मानले .यावेळी डॉक्टर पी डी पाटील राजीव बर्वे विनोद कुलकर्णी माधव राजगुरू रामदास फुटाणे डॉक्टर राजा दीक्षित यांच्यासह राज्यभरातून अनेक नामवंत साहित्य उपस्थित होते. सुभाष कवडे यांना शिरोळे पुरस्कार त्यांच्या बालकुमारांसाठी कवडे यांचे दोन बालकविता संग्रह एक संस्कार कथासंग्रह आणि एक मुलांच्यासाठी संपादित पुस्तक प्रसिद्ध आहे .साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून ते गेली चोवीस वर्षे वाचन चळवळ मुलांच्या मध्ये रुजवण्यासाठी कार्य करीत आहे या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक मान्यवरांनी सुभाष कवडे यांचे अभिनंदन केले आहे .श्रीमत कवडे यांना जाहीर झाला आहे तो या समारंभात करण्यात आला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी सुभाष कवडे यांचे सर्वत्र कौतुक अन् अभिनंदन होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!