महाराष्ट्र

तासगाव पोलिस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांची सार्वजनिक वाचनालय भिलवडीला सदिच्छा भेट

साहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती

 

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी ला बुधवारी  सचिनजी थोरबोले पोलीस उपाधीक्षक तासगाव यांनी सदिच्छा भेट दिली. वाचनालयाचे अध्यक्ष  गिरीश चितळे यांनी त्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. यावेळी भिलवडी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत  यांचेही स्वागत ग्रंथ भेट देऊन केले. वाचनालयाच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले .आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रांतीचे माजी संचालक महावीर भूपाल चौगुले उपस्थित होते .पाहुण्यांचे स्वागत वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे (सर )यांनी केले .यावेळी ग्रंथपाल वामन काटीकर लेखनिक विद्या निकम ,मयुरी नलवडे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!