महाराष्ट्र
करवीर तालुक्यातील सावरवाङी येथील शेतकर्याचा विहिरीत पङून मृत्यू

कोल्हापूरः अनिल पाटील
करवीर तालुक्यातील सावरवाङी पैकी ढोनेवाङी गल्लीतील पांङुरंग राऊ कंदले (वय 75 ) या शेतकर्याचा विहिरीत पङून मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारस घङली.
पांङूरंग कंदले हे सकाळी आपल्या शेताकङे गेले होते. त्यानंतर ते हात पाय धूण्यासाठी ते तेथील विहीरीजवळ गेले होते. हात पाय धूत असतानां त्यांनां अचानक चक्कर आल्याने ते विहीरीत कोसळले आणि त्यांचा पाण्यात बूङून मृत्यू झाला. त्यांचे कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सी पी आर पोलिस चौकीत झाली आहे. त्यांच्या पश्चात”पत्नी”” एक मुलगा आहे.