महाराष्ट्र

पलूस येथे कै.वसंतरावजी पुदाले (दादा) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पत्रकारांचा स्नेहमेळावा, सत्कार समारंभ उत्साहात

पलूस येथील वसंतरावजी पुदाले (दादा) मित्रमंडळ,स्वामी विवेकानंद वाचनालय, पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन : पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

 

पलूस : पलूस येथील वसंतरावजी पुदाले (दादा) मित्रमंडळ व स्वामी विवेकानंद वाचनालय, पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने कै.वसंतरावजी पुदाले (दादा) यांच्या पाचव्या पुण्यस्मरणा निमित्त पत्रकारांचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .यानिमित्त कार्यक्रमासाठी शिवराज काटकर (राज्य उपाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद), सुरेश गुदले (संपादक, दैनिक पुढारी, सांगली) ,डॉ. हेमंत मोरे, (वरिष्ठ उपसंपादक, दै. केसरी), चंद्रशेखर क्षीरसागर, यशोवर्धन मोरे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पदाले आप्पा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धनंजय धोंडे तात्या यांच्यासह सर्व दैनिकांचे संपादक उपसंपादक सर्व पत्रकार प्रमुख उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले साहेब यांनी केले. आपल्या प्रास्ताविक पर मनोगतामध्ये पलूस नगरपरिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले साहेब यांनी कै.वसंतरावजी पुदाले दादा यांनी केलेले कार्य व आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.यावेळी गणपतराव पुदाले,हेमंत मोरे ,विकास सूर्यवंशी ,शिवराज काटकर सुरेश गुदले यांनी आपले मनोगतातून पत्रकारांना मार्गदर्शन केले. व मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, डॉ पतंगराव कदम यशवंत पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन विष्णू सिसाळ, धोंडीराज विकास सोसायटीचे अध्यक्ष विलास हजारे, अजित कुलकर्णी, अनिल कदम, ईश्वरा सिसाळ, पांडुरंग पुदाले सतीश पवार, महेश माने, जगन्नाथ पुदाले, विजयसिंह कदम, संदीप पवार यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले तर आभार डॉ.संपतराव पार्लेकर यांनी मानले. संयोजन श्री वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास पुदाले, स्वामी विवेकानंद वाचनालयाचे उपाध्यक्ष सतीश पवार, सर्व संचालक मंडळ समर्थ स्कूलचे प्राचार्य गणेश डुबल सर, यशवंत कदम तुकाराम धायगुडे यांच्यासह सर्व सदस्य यांनी केले. या कार्यक्रमास पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!