महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवा : पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

माझी वसुंधरा अभियानाचा  विभागीय आयुक्तांकडून आढावा

 

        सांगली : गावे व शहरे स्वच्छ व्हावीत, लोकांना स्वच्छतेची सवय जडावी, नागरिकांनी स्वच्छतेची जीवन पध्दती अंगीकारावी यासाठी जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.

            जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी माझी वसुंधरा अभियानातील कामांचा आढावा घेतला.  बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

            डॉ.  पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे. स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षण व संवर्धन होते. माझी वसुंधरा अभियानात भूमि, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पाच घटकांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम होत आहे. यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवून आपला भाग स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी शालेय विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावतो. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा संदेश पोहचवावा.            स्वच्छतेसाठी ग्रामस्तरापर्यंत मजबूत टीम असावी. तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी स्वच्छतेसंदर्भात नियमित बैठका घ्याव्यात. जिल्हास्तरावरून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी जिल्ह्यात त्यांच्या विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!