महाराष्ट्र
कुपवाड येथील प्रभाकर माने यांचे निधन

सांगली: प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक अमोल माने यांचे वडील, कुपवाड नगरीतील ज्येष्ठ पत्रकार, बिझनेस एक्सप्रेस मासिक व साप्ताहिकाचे प्रतिनिधी प्रभाकर लक्ष्मण माने यांचे (७२) सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. फुले टाकण्याचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी बुधवार दिनांक – १५ मे २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता ख्रिश्चन दफनभूमी वडर गल्ली सांगली येथे होणार आहे.