संतांची शिकवण आयुष्य सार्थकी जाणारी : इंद्रजित देशमुख
सार्वजनिक वाचनाय भिलवडी ८४ वा वर्धापन दिन ; हास्य यात्राकार शरद जाधव यांना ग्रंथोपासक पुरस्काराने सन्मानित

भिलवडी :- संतांनी आपल्याला आपल्याला दिलेली शिकवण ही चिर काळ टिकणाारी असून आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने गेलो तर आयुष्य सार्थकी लागेल असे मत ख्यातनाम वक्ते इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.येथील सार्वजनिक वाचनायाच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने हास्य यात्राकार शरद जाधव यांना ग्रंथोपासक पुरस्कार वितरित करण्यात आला.यावेळी देशमुख यांचे पसायदान या विषयावर प्रवचन झाले.
ते पुढे म्हणाले की स्वतः साठी मागतो ती भिक, कुटुंबासाठी मागतो ती भिक्षा, समाजासाठी मागतो ते दान आणि अखंड विश्वाच्या कल्याणासाठी मागतो ते पसायदान होय.सकारात्मक कसे रहावे हेच सर्व संतांनी दिलेल्या शिकवणीचे सार आहे.कोणतेही दान देत असताना ते कुरकुरत न देता आनंदाने द्यावे असे माऊली म्हणतात.जे कर्म केल्याने इतरांना आनंद प्राप्त होतो ते म्हणजे सत्कर्म होय.हजारो वेदना असलेली तडफडणारी माणसं ज्यांना जाणवली ते संत.जोपर्यत प्रत्येकाच्या मनातील पाप निघून जाणार नाही तोपर्यंत कोणतीही व्यक्ती सुखी होणार नाही.यामुळे ज्ञानेश्वर माऊली यांनी दिलेली शिकवण आपणा सर्वांना तारणहार आहे.यावेळी पसायदान मधील प्रत्येक पंक्तीचा भावार्थ त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केला.ग्रंथोपासक पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद जाधव यांनी वाचनालयाचे आभार मानून आता माझी जबाबदारी अजून वाढली असून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती मकरंद चितळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी वाचनालय राबवत असलेले विविध उपक्रम याचा आढावा घेऊन वाचन कट्ट्यामुळे भिलवडीतील वाचन चळवळ अधिक समृद्ध होत असून भविष्यात वाचनालयाच्या वतीने अजून अधिक सोयी सुविधा देण्याचा मानस व्यक्त केला.कार्यवाहक व साहित्यिक सुभाष कवडे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.यावेळी श्रीकांत जंगम यांनी उत्कृष्ट अशी पुस्तके तर सुरेश कोळेकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी वाचनालयाला भेट दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी नलवडे यांनी केले तर आभार जेष्ठ संचालक भूपाल मगदूम यांनी मानले.यावेळी
महावीर वठारे,ए के चौगुले,माजी न्यायमूर्ती माळी साहेब,हनुमंतराव दिसले,दत्ता उतळे ,सुबोध वाळवेकर,सहेलीच्या अध्यक्षा सौभाग्यवती वाळवेकर,प्रमोद कुलकर्णी यांच्यासह परिसरातील शेकडो वाचक उपस्थित होते.