महाराष्ट्र
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

सांगली छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या अभिवादन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.