राजकीय

अपार कष्टात हरहुन्नरी पत्रकार शशिकांत कांबळे यांनी डीग्री केली प्राप्त

 

भिलवडी :
शिक्षणाला वय नसत..हे खरचं आहे याची प्रचिती नुकतीच भिलवडी येथे आली असून,आपले शिक्षण अपूर्ण असल्याची खंत मनामध्ये असलेल्या
भिलवडी येथील शशिकांत कांबळे यांनी वयाच्या चाळीशीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर नुकत्याच झालेल्या बीएच्या तिसऱ्या वर्षासाठी झालेल्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवत आपली शिक्षणाबाबतची इच्छा पूर्ण केली.

बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये शिकणारा विद्यार्थी शशिकांत भिमराव कांबळे वय वर्षे -४२ यांनी प्रतिकुल परिस्थितीतून वाट काढत आणि आई वडीलांच्या व पत्नीच्या सहकार्याने शशिकांत याने उत्कृष्ठ गुण मिळवून बी.ए . डिग्री पूर्ण केली. घरातील अडचणीमुळे कमी वयात प्रपंचाची जबाबदारी अंगावर पडली यासाठी त्यांनी भिलवडीतील वाळवेकर हार्डवेअर दुकानामध्ये काम पत्करले. त्याबरोबर सी न्यूज चॅनलचे वार्ताहर म्हणून काम केले.हे करीत असताना त्यांनी पत्रकारीतेचा कोर्स पूर्ण केला. त्याचबरोबर दुकानामध्ये काम करत असताना, व्यस्त कामातून वेळ काढून त्यांनी क्रांतीसूर्य न्यूज हे नवीन यु ट्युब चॅनेल सुरु केले . मल्टी मिडियामध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा उमठविला त्यांच्या क्रांतीसूर्य न्यूज चॅनेलने यू ट्यूब सह वेगळा ठसा उमठविला. क्रांतीसूर्य न्यूज चॅनेल हे आजचे बातमीचे उत्कृष्ठ चॅनेल बनले . दुकानात काम करीत असताना, त्यांनी अनेक माणसं जोडली. सांगली ,कोल्हापूर , सोलापूर सातारा जिल्ह्यातील बातम्यांना त्यांनी आपल्या चॅनेवरून प्रसिद्धी दिली .
प्रतिकुल परिस्थितीतून जात असताना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले ते वाळवेकर बंधूने संपूर्ण दुकानाची जबाबदारी त्यांनी सांभाळत बी.ए . करण्याचे स्वप्न मनी बाळगून महाविद्यालयातील प्राध्यापकांशी चर्चा करून, बी. ए . भाग १ ला प्रवेश घेतला. प्रत्येक वर्षीच्या दोन परीक्षा व होमवर्क व्यवस्थितरित्या पार पाडून आणि मिळालेल्या वेळेत अभ्यास करून . बी ए चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले . या यशाला जसा घरातून पाठींबा मिळाला त्याच प्रमाणे वाळवेकरांचाही पाठींबा मिळाला . त्यांचे मित्र वार्ताहर पंकज गाडे , आर.पी.आय. चे अमरजित कांबळे, मित्र मंडळी, वर्गातील सहकारी विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राचार्य , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या यशाबदल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!