राजकीयमहाराष्ट्र

लोकांनी मनातला खासदार अगोदरच मला ठरवलंय; दोन ते तीन लाख मतांनी निवडून येणार ; विशाल पाटील

भिलवडी येथे सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांची बैठक ; अनेक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ऱ्यांची उपस्थिती अन् उत्साह

 

f

 

भिलवडी : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते मिळाले नाही. वसंतदादा पाटील यांचा नातू कदापि मागे हटणार नाही, अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच मी उभा राहिलो आहे. लोकांनी आपल्या मनातला खासदार अगोदरच मला ठरवलं असून दोन ते लाखांच्या मतांनी मी निवडून येणार , असे सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल दादा पाटील यांनी सांगितले.

भिलवडी येथील बैठकीत विशाल दादा पाटील यांनी चांगलीच बॅटिंग केली.

विशाल पाटील म्हणाले की, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा  पाटील यांचे निधन होऊन 35 वर्ष झाले तरीही लोक दादा घराण्यावर प्रेम करतात हे मी ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क आल्यावर कळाले. आमचे मोठे बंधू प्रतीक पाटील हे खासदार झाले, केंद्रीय मंत्री झाले, त्यांनी अनेक प्रकारचा निधी आणून सांगली जिल्ह्याचा विकास केला. ‌मात्र , दरम्यान लोकांशी संपर्क साधावा, हे आम्हाला कळालं नाही, हे आम्ही कबूल करतो, असे सांगून ते म्हणाले की, लोकांची सेवा करणार, सांगली जिल्ह्याचा विकास करणार हेच प्रामाणिक ध्येय माझे असून लोकांनी दिलेले प्रेम मी विसरणार नाही या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भिलवडी गावाने मला मताधिक्य दिले.  यावेळीही पलूस तालुक्यातील मतदार बंधू-भगिनी मला अधिक मते देतील, अशी आशा आहे. असे सांगून विरोधकांची त्याऐ चांगलीच खिल्ली उडवली.

यावेळी विशाल पाटील म्हणाले, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिला ते मी माझे भाग्य समजतो.  यामुळे नक्कीच मी दोन ते तीन लाख मतांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन खासदार होणार ,असेही पाटील यांनी सांगितले.

या बैठकी दरम्यान विशाल दादा पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून देऊन खासदार करूया अशा भावना अनेक पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या.

यावेळी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, माजी सरपंच शहाजी भाऊ गुरव, पांडुरंग टकले, विजयकुमार चोपडे, भिलवडी दक्षिण भाग  सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब काका मोहिते, मोहन पाटील सर, बी डी पाटील सर,
माजी उपसरपंच चंद्रकांत भाऊ पाटील, बाळासो मोरे, मोहन नाना तावदर, बाबासाहेब मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, यांसह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!