मानसिंग को-ऑप बँकेची आर्थिक स्थिती भक्कम ; १० टक्के लाभांश खातेवर जमा : संस्थापक जे के बापू जाधव
मानसिंग को-ऑप बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दुधोंडी येथील प्रधान कार्यालयात उत्साहात

दर्पण न्यूज दुधोंडी (ता. पलूस) :
मानसिंग को-ऑप बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दुधोंडी येथील प्रधान कार्यालयाच्या पटांगणामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन मा. सुधीर (भैय्या) जाधव होते. वार्षिक अहवाल त्यांनी सादर केला.
या प्रसंगी बँकेचे संस्थापक लोकनेते मा. जे. के. (बापू) जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नेहमीप्रमाणे १० टक्के तरतूद आणि पुढच्या वर्षाची सुद्धा यंदाच तरतूद केल्याने बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. बँकेचे रिझर्व्ह फंड ३३ कोटींपेक्षा जास्त असल्याने सभासदांनी बँकेवर विश्वास वाढविला आहे. जेवढी कर्जे दिली ती सर्व सुरक्षित आहेत त्यामुळे ठेवींचे प्रमाण वाढले आहे. बँकेने ठेवी घेणे आणि कर्जे देणे इतपत न राहता इतर सुविधा ही पुरवल्या जातात.
वीज बिल भरणा केंद्राद्वारे ग्राहकांना लाभ होत आहे. शेती आणि इतर कर्जाला दिलेल्या कर्जातून चांगला परतावा आहे. बुडीत कर्जाची तरतूद नफ्यातून न घेता सभासदांच्या हक्कावर गदा आणली नाही. बँकेने तंत्रज्ञानाचा सर्व शाखेत वापर केला आहे.
बँकेच्या जवळपास स्वमालकीच्या इमारती आहेत. बँकेने सभासद कल्याण निधी, कामगार कल्याण निधी काढला आहे यातून त्यांच्या संकटकाळात मदतीचा हात बँकेकडून दिला जाईल.
कर्जे देण्यासाठी बँक सक्षम आहे, घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून सहकार्य करावे.
सध्या बँकेच्या दुधोंडी, पलूस, सांगली, विटा व कराड अशा पाच शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी पलूस व कराड शाखा वर्षभर (३६५ दिवस) सुरु असतात. ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेत सीबीएस प्रणाली, मोबाईल बँकिंग, यूपीआय, एसएमएस व मिस कॉल अलर्ट, आरटीजीएस, एनईएफटी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
बँकेची थकबाकी व एनपीए अत्यल्प असल्याने आर्थिक दृष्ट्या बँक अत्यंत सक्षम स्थितीत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. संचालक मंडळाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार सभासदांना १० टक्के लाभांश थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे “ग्रामीण भागातून शहरी भागाकडे वाटचाल करत असलेल्या मानसिंग बँकेने समाजातील दुर्बल घटकांना स्वावलंबी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. शेतमजूर, गोरगरीब, मध्यमवर्गीय, दुकानदार, व्यापारी ते उद्योगपतीपर्यंत सर्वांचा सहभाग या यशामध्ये आहे. बँकेचे सभासद, कर्मचारी व हितचिंतक यांचे मनापासून आभार मानतो.”
यावेळी या सर्वसाधारण सभेच्या वेळी लोकनेते जे के बापू जाधव क्रेडिट सोसायटीचे व मीनाक्षीदेवी जे के बापू जाधव क्रेडिट सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सत्कार करण्यात आले तसेच हणमंत जाधव यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलूस तालुका वसूलिआधिकारी पदी निवड झालेबद्दल तसेच मानाजी कदम यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलूस तालुका विभागीय अधिकारी पदी निवड झालेबद्दल तसेच नागेश ठोंबरे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यक्रम अधिकारी पदी निवड झालेबद्दल, तसेच विष्णू रोकडे व गोपाळ पाटसुपे यांची उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व अशोक भोसले यांचा डॉ पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या उत्कृष्ट कामगार पुरस्कार मिळालेबद्दल व इतर मान्यवरांचे सत्कार या कार्यक्रममध्ये करण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन संचालक हानीफ मुजावर यांनी केले तर आभार अँड सचिन पाटील यांनी मानले, यावेळी, व्हा चेअरमन दौलत लोखंडे, उमेश लाड, पलुस उद्योजक सागर नलवडे, अजित सूर्यवंशी, पतंगराव पाटील, अँड अर्जुन कोकाटे, महादेव रानमाळे, आप्पासो चव्हाण, अमृत नलवडे, हणमंत कारंडे, सुरेश यादव, सूर्यकांत बुचडे रमाकांत घोडके, विजय आरबूने, नागराज रानमाळे, रवींद्र आरबूने, हिंदुराव कदम, नागनाथ साळुंखे, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मॅनेजर हणमंत महाडीक, शाखाधिकारी राजेश नेने, प्रकाश आरबूने, गणेश जाधव, अभिजीत कत्ते, बाबासो जाधव तसेच ठेवीदार, खातेदार व सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.