सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय पाटील यांचे भारतीय जनता पार्टीतर्फे दोन नामनिर्देशनपत्र दाखल
सांगली लोकसभा मतदार संघात चौथ्या दिवशी 9 उमेदवारांची 11 नामनिर्देशन पत्रे दाखल
सांगली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44–सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी 9 उमेदवारांनी 11 नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
(1) पांडुरंग रावसाहेब भोसले यांनी भारतीय जवान किसान पार्टी तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(2) संजय रामचंद्र पाटील यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली.
(3) आनंदा शंकर नालगे यांनी बळीराजा पार्टी तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(4) सुवर्णा सुधाकर गायकवाड यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तीहादूल मुसलीमीन पक्षा तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(5) डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षा तर्फे एक व अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली.
(6) अजित धनाजी खंदारे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(7) महेश यशवंत खराडे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(8) नानासो बाळासो बंडगर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(9) रविंद्र चंदर सोलनकर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.