येळावी विकास सोसायटीचे माजी चेअरमन घनश्यामआप्पा भंडारे यांचे निधन

तासगाव :
येळावी गावचे जेष्ठ नेते येळावी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन घनश्याम (अप्पा) यमाजी भंडारे वय 86 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
बुद्धवासी घनश्याम (आप्पा) भंडारे यांचे सामाजिक व राजकीय कार्य आदर्शवत होते, ग्रामस्वच्छता व बैलगाडी यावर त्यांचा भर होता, त्यांनी संपूर्ण आयुष्यात स्वच्छतेला महत्व दिले, वृक्ष लागवड व पाण्याची काटकसर त्यांनी केली होती. येळावी परिसरातील अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी सोडवले होते, आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक बहुजन नेते भिमरावभाऊ भंडारे यांचे ते चुलते होत. बुद्धवासी घनश्याम आप्पांच्या पश्चात एक मुलगा, पुतणे नातवंडे मुली जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
रक्षाविसर्जन व जलदान विधी शुक्रवार दि 19 एप्रिल रोजी येळावी ता तासगाव येथे सकाळी 9 वाजता आयोजित केला आहे.