गारगोटी येथे भर दिवसा दरोडा : नागरिकांत भीतीचे वातावरण
भुदरगड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ नागरिकांसह पोलिस प्रशासन ही हैराण*

गारगोटी:- गारगोटी गडहिंग्लज रोड मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गणेश नगर येथील राहत्या घरी आज भर दिवसा धाडसी दरोडा यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गारगोटी गणेश नगर येथे राहणाऱ्या शोभा घाटगे यांच्या राहत्या घरात आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून पाच तोळे सोन्यासह, दहा हजार रोख व इतर चांदीचे दागिने लंपास केले.
मिळालेल्या माहितीनुसार शोभा घाटगे यांच्या वडिलांचा द्रोणचा व्यवसाय गारगोटी शहरामध्ये आहे. नेहमी प्रमाणे आपल्या वडिलांना दुपारचा जेवणाचा डबा देण्यासाठी साडेबाराच्या दरम्यान त्या गेल्या होत्या. सदारण दीड-पावणे दोन च्या दरम्यान त्या परत आल्या असता घराचे दोन्ही दरवाज्याची कुलपे तुटल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने शेजारी तेथे मदतीला धावूनआले. सर्वांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान विस्कटलेले, तिजोऱ्या फोडलेल्या ,रोख रकमेसह दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच भुदरगड पोलिसांना सदर घटनेची माहिती फोन द्वारे स्थानिक नागरिकांनी दिली.
क्षणाचा विलंबही न लावता भुदरगड पोलीस पदक घटनास्थळी दाखल झाले. चोरी ही सराईत पद्धतीने करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर हून ठसे तज्ञ व श्वान पथक पाचरण केले. काही तासातच कोल्हापूरहून श्वान पथक व तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी पोहोचले. ठसे तज्ञांच्या हाती काही पुरावे लागले असून त्याचबरोबर,श्वान पथकाने देखील चोरांचा माघ काढण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच हे गुन्हेगार पकडले जातील असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
मात्र भुदरगड तालुक्यातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांबरोबरच पोलीस प्रशासन ही हैराण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे, आपल्या मौल्यवान वस्तू गरज नसताना घरात न ठेवण्याचे, घर किंवा कॉलनी च्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे त्याचबरोबर अनोळखी व्यक्तींना आपली खरी माहिती न देण्याचे आव्हान पोलिसांनी कडून करण्यात आले आहे. सदर घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत.