अपघातात हात गमावलेल्या विष्णू गाताडे यांना 35 हजार रुपयाची मदत

दर्पण न्यूज भिलवडी / नांद्रे :- सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील नांद्रे येथील वायरमन विष्णू आप्पासो गाताडे यांना शॉक लागून त्यांचा हात निकामी झाल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी एपी ग्रुप नांद्रे संस्थापक प्रदीप मदने व अरविंद कुरणे व सर्व मित्र परिवार यांच्याकडून 35 हजार रुपयाची मदत त्यांना करण्यात आली हा चेक त्यांची पत्नी व मुलगी यांनी स्वीकारला
वायरमन विष्णू आप्पासो गाताडे यांना नांद्रे गावात भूतनाळ भागात १९ ऑगस्ट रोजी नांद्रे येथे ट्रान्सफॉर्मरचा डिओ गेल्यामुळे तो बसविण्यासाठी काम करत असताना अकरा हजार व्होलटेजचा तीव्र धक्का विष्णूला बसला. विष्णू पोल वरून खाली पडला.
व हात जागीच निकामी झाला. तातडीने त्यांना उपचारासाठी पंकज कुपवाडे या दवाखान्यात नेण्यात आले तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सीनर्जी हॉस्पिटल मिरज येथे दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा हात भाजल्यामुळे हात काढावा लागला हात काढल्यामुळे विष्णू हे कायमस्वरूपी त्यांना अपंगत्व आले
विष्णू वायरमन परमनंट नव्हते गेले 21 वर्षे झालं महावितरण विभागाच्या खाजगी कंपनीकडून काम करत आहेत त्यामुळे त्यांना महावितरण विभागाकडून मदत होऊ शकत नाही विष्णू यांच्या उपचारासाठी पाच ते सहा लाख रुपयाचा खर्च आहे व घरची परिस्थिती हालाकीची असल्याने घरचे उपचारासाठी खर्च करू शकत नाही त्यामुळे ए पी ग्रुप संस्थापक प्रदीप मदने व अरविंद कुरणे यांनी खारीचा वाटा म्हणून ही मदत सढळ हाताने केली.
विष्णू यांनी गेले 21 वर्ष नांद्रे गावाची महावितरणाच्या कर्मचारी म्हणून सेवा केली आहे कोरोना काळ,महापुराचा काळ यामध्ये त्यांनी जीवाची परवा न करता आपली कामगिरी चोकपणे पार पडली आहे.आता सध्या त्यांना मदतीची गरज आहे ए पी ग्रुप ने स्वतः 35000 रुपयाची मदत करून त्यांना सर्वांनी मदत करावी असे आवाहन एपी ग्रुपचे संस्थापक प्रदीप मदने व अरविंद करणे यांनी केले आहे. चेक देते वेळे माजी खासदार संजय काका पाटील एम एम ग्रुपचे संस्थापक मोहन नाना मदने, राजवर्धन प्रतीक पाटील,एपी ग्रुपचे संस्थापक प्रदीप मदने, अरविंद कुरणे उपस्थित होते.