व्हनाळी येथे पोषण पखवाडा 2025 कार्यक्रमाचे आयोजन

दर्पण न्यूज कागल प्रतिनिधी (मारुती डी कांबळे):-शेंडूर बीट अंतर्गत व्हनाळी येथे पोषण पखवाडा 2025 कार्यक्रमांतर्गत *आयुष्यातील महत्त्वाचे सुरवातीचे 1000 दिवस, मुलांमधील लठ्ठपणा कमी करणेकरिता निरोगी जीवनशैली* या विषयांबाबत अंगणवाडी स्तरावर आरंभ उपक्रम आधारित मोजके स्टॉल्स जसे की गरोदर मातेचा आहार व लसीकरण,0-2 वर्षे वयोगटातील बालक व त्यांचे पालक यांच्यासाठी घरगुती व परिसरातील वस्तूंपासूनचे विविध खेळ, मेंदूचे जाळे, मायेचा घास, टिकलीचा खेळ, मला खा , मला खाऊ नका, मोबाईल वापराचे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम इत्यादी स्टॉल्स ची मांडणी करून बालक व पालकांसोबत विविध उपक्रम घेणेत आले.
याप्रसंगी बालकाच्या वाढ व विकासाकरिता त्याच्या सुरवातीच्या 2 वर्षाच्या काळात कुटुंबाने त्याची कशा प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत बीट पर्यवेक्षिका श्रीम. विद्या शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपसरपंच श्री.ओंकार कौंदाडे यांनी अशा उपक्रमातून सेविका मदतनीस पालकांमध्ये अतिशय उत्तम वर्तणूक बदल घडवत असून त्याबाबत सेविका मदतनीस तसेच पूर्ण महिला व बाल विकास विभागाचे कौतुक व्यक्त केले.
डॉ. जयश्री पाटील तसेच CHO सुधाकर पाटील यांनीही उपस्थितांना आरोग्य व लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पोषण ट्रॅकर वर लाभार्थी स्वतः कशाप्रकारे नोंदणी करू शकतात याबाबत सेविकेनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी व्हनाळी गावचे सरपंच श्री दिलीप कडवे, मुख्याध्यापक , शिक्षक , सेविका, मदतनीस तसेच मोठ्या संख्येने माता व बाबा पालक , बालके, किशोरी मुली उपस्थीत होती.