महायुती सरकारला आता घरी बसवण्याची वेळ : खासदार डॉ. अमोलजी कोल्हे
डॉ विश्वजीत कदम यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ नेवरी (ता. कडेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. अमोलजी कोल्हे यांची सभा

कडेगांव :महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता, शेतकरी व तरुणांना देशोधडीला लावणाऱ्या या निष्क्रिय व भ्रष्ट महायुती सरकारला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी प्रचंड मताधिक्याने विजयी करा व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी खंबीर साथ द्या, असे आवाहन खासदार डॉ. अमोलजी कोल्हे केले. पलूस-कडेगाव विधानसभेचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ नेवरी (ता. कडेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संसदरत्न खासदार डॉ. अमोलजी कोल्हे सभेत बोलत होते.
यावेळी डॉ विश्वजीत कदम म्हणाले की , काँग्रेस व महाविकास आघाडीची लोकसेवेची पंचसूत्री व जाहीरनाम्यातील जनहिताच्या विविध योजना आहेत.पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासाला गती देऊन आपला मतदारसंघ देशातील एक आदर्श व विकसित मतदारसंघ बनविण्यासाठी महाविकास आघाडीला खंबीर साथ द्या. येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
यावेळी माजी आमदार मोहनराव (दादा) कदम, आ. अरुण (अण्णा) लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांतारामबापू कदम, शिवसेना नेते सुभाष मोहिते, युवा नेते जितेशभैय्या कदम, अॅड. ए. पी. मदने, इंद्रजीत साळुंके, हिम्मतराव देशमुख, मालनताई साळुंके यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नेवरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.