वारणा धरणात 28.93 टी.एम.सी. पाणीसाठा : मिरज तालुक्यात 31.5 मि.मी. पावसाची नोंद

वारणा धरणात 28.93 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली, जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 28.93 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 64.32 (105.25), धोम 9.50 (13.50), कन्हेर 5.77 (10.10), वारणा 28.93 (34.40), दूधगंगा 14.92 (25.40), राधानगरी 8.30 (8.36), तुळशी 1.91 (3.47), कासारी 2.28 (2.77), पाटगांव 2.78 (3.72), धोम बलकवडी 3.51 (4.08), उरमोडी 5.34 (9.97), तारळी 5.02 (5.85), अलमट्टी 81.14 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 18.9 (40) व अंकली पूल हरिपूर 24.10 (45.11).
कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम 150, कण्हेर 24, वारणा 3175, राधानगरी 7112, कासारी 1000, धोम बलकवडी 1339, उरमोडी 490, तारळी 2854 व अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्यसेक्स विसर्ग सुरू आहे.
मिरज तालुक्यात 31.5 मि.मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून मिरज तालुक्यात सर्वाधिक 31.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 31.5 (174.4), जत 19.7 (138.4), खानापूर-विटा 15.1 (105.3), वाळवा-इस्लामपूर