कोल्हापुरातील पहिली महिला फुटबॉल पंच कुमारी सिद्धी शेळके हिची इंटर युनिव्हर्सिटी क्रीडा महोत्सव 2024 करिता पंचपदी नियुक्ती ; पंच ऋषिकेश ढोबळे, शरद शिर्के यांचीही नियुक्ती

कोल्हापूरः अनिल पाटील
इंटर युनिव्हर्सिटी क्रीडा महोत्सव रायगड येथील लोणेरी येथे दिनांक 3 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे. या क्रीडा महोत्सव अंतर्गत होणाऱ्या फुटबॉल अजिंक्यपदसाठी कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनची महिला पंच सिद्धी रवींद्र शेळके तर पंच ऋषिकेश ढोबळे व शरद शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्याशी संलग्न असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पंच असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे.सिद्धी ही एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू व डी लायसन्स धारक असून विविध वयोगटातील महिला खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. सिद्धी ही के एस ए च्या मान्यतेने होणाऱ्या विविध फुटबॉल सामन्यांसाठी पंच म्हणून उत्कृष्ट पंचभूमिका पार पाडत असून बाहेरील स्पर्धांसाठी महिला पंच म्हणून काम करणारी ती कोल्हापुरातील पहिली महिला फुटबॉल पंच आहे.
तसेच पंच ऋषिकेश ढोबळे व शरद शिर्के हे उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू असून ते उत्तम पंच म्हणून कार्यरत आहेत.सिद्धी शेळके, ऋषिकेश ढोबळे व शरद शिर्के यांना संस्थेचे पेट्रन इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारणी सदस्य व के एस ए अध्यक्ष मा.श्री मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्या सौ.मधुरिमाराजे छत्रपती, ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासणे फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले. व कोल्हापूर सॉकर रेफ्री
असोसिएशनचे अध्यक्ष श्री श्रीनिवास जाधव, सेक्रेटरी श्री प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.