भिलवडी येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती पलूस यांच्या वतीनेस्व. आ.डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी मोफत महाआरोग्य शिबिर

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती पलूस
जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत
स्व. आ.डॉ. पतंगराव कदम (साहेब)
यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . माजी विधान परिषद सदस्य मोहनराव कदम दादा यांच्या अध्यक्षतेखाली खासदार विशाल दादा पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण अण्णा लाड तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महिंद्र आप्पा लाड, प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते या मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
सदरचे महा आरोग्य शिबिर हे मंगळवार दिनांक१८ मार्च २०२५ रोजी
सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत आयुष्यमान आरोग्य मंदिर भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथे संपन्न होणार आहे. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पलूस तालुका आरोग्य अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद यांनी केले आहे