महाराष्ट्र
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 63 वा वाचन कट्टा संपन्न

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आज एक मार्च 2025 रोजी 63 वा वाचन कट्टा संपन्न झाला.
महिलांच्या कर्तबगारी संबंधित मी वाचलेले पुस्तक हा विषय या वाचन कट्ट्यावर घेण्यात आला होता 13 वाचकांनी या ठिकाणी सादरीकरण केले यावेळी कार्यवाह सुभाष कवडे यांनी स्वागत प्रास्ताविक करून महिलांच्या विषयीच्या कर्तबदारीच्या कथा सांगितल्या विश्वस्त जीजी पाटील उपाध्यक्ष डी आर कदम सर भूना मगदूम सर रमेश पाटील महादेव जोशी बाळासाहेब पाटील हनुमंतराव दिसले यांच्यासह वाचक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते