महाराष्ट्रराजकीय

मी पक्का काँग्रेसचाच, मिरजेतून हाताच्या चिन्हावरच निवडणूक लढणार ; काँग्रेसचे नेते, उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा निर्धार

 

गेल्या अनेक वर्षापासून मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये काम पाहत आहे. अनेक सामाजिक, राजकीय शैक्षणिक आणि लोकहिताचे कार्य मी या मतदारसंघात केलेले आहेत. कोण काय म्हणाले याकडे न पाहता मी पक्का काँग्रेसचाच आणि काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावरच मिरज मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे, असा निर्धार काँग्रेसचे नेते, उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले की,
मिरज विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी मी मैदानात उतरलेलो आहे. जनसामान्यांचा पारदर्शी चेहरा म्हणून मला मतदार संघातून मोठी पसंती मिळत आहे. मिरज मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ताकदीने लढणार असून मतदार जनशक्तीच्या जोरावर आपण विजय मिळवू, असा आत्मविश्वासाने मी निवडणूक लढविण्यासाठी पुढे आलो आहे. मिरज मतदारसंघातून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीने मला संधी द्यावी. लोकहिताची कार्य आणि विकासाचे कार्यच मी डोळ्यासमोर ठेवून आज मी कार्य करत आहे, नुसते आश्वासन देण्याचा माझा हेतू नसून लोकांचे कार्य करणे हा माझा मूळ हेतू आहे. मी आश्वासन देत नाही, तर प्रत्यक्ष कार्य करूनच दाखवतो. २०१४ ला मी मिरज विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हापासून आजअखेर मतदारसंघात सक्रिय आहे. मतदार संघात जनसंपर्क आहे. आपणाला कुठलाही राजकीय वारसा नाही. तरीही माझ्या मतदार संघात महिलांसाठी रोजगार निर्मिती करत मोठी पायाभरणी केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात योगदान आहे. रोजगार निर्मितीचे साधन तयार करून आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा मी प्रयत्न यशस्वी करत आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण संकल्प केला आहे.
२०२४ ची निवडणूक आपल्यासाठी आर या पारची लढाई असेल. निश्चितच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून इतिहास आपण घडवणार आहे, असा विश्वासही सी आर सांगलीकर यांनी स्पष्ट केला.
उद्योगपती सी आर सांगलीकर म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून मी मिरज मतदार संघात सामान्य नागरिकांशी संवाद साधत आहे. कोणावरही टीका करणे हा माझा उद्देश नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, त्यासही माझा पूर्ण पाठिंबा असणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांचा आणि माझ्या हितचिंतकांचा मला नेहमीच पाठिंबा असणार आहे. त्यामुळे मिरज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी पुन्हा एकदा जोमाने काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे असेही उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
यावेळी सी आर सांगलीकर फाउंडेशनचे पदाधिकारी आणि हिचिंतक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!