
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल मध्ये दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण कथाकार श्री. रवी चंद्रकांत राजमाने सर (येळावी) उपस्थित होते. श्री. राजमाने सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनीं त्यांची **छोटा रिचार्ज** नावाची कथा सांगून विद्यार्थी जीवनामध्ये त्याची गरज का आहे हे सांगितले. विद्यार्थी दशेत असे संस्कार गरजेचे आहेत. कष्ट, चिकाटी, गरजूंना मदत करणे, प्रामाणिकपणा ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सांगितले. आपल्या विनोदी भाषाशैलीने एक विनोदी कथा सांगून जमलेल्या सर्वांना खळखळून हसायला लावले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. विश्वास चितळे सर, संचालक श्री.गिरीश चितळे सर, संस्थेचे सेक्रेटरी श्री. मानसिंग हाके सर, संस्थेचे संचालक श्री व्यंकोजी जाधव सर तसेच लिना वहिनी चितळे, के.जी. विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सुग्रास भोजनाचा आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.