महाराष्ट्र
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 22 रोजी सांगली जिल्हा दौरा

सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शुक्रवार, दि. 22 डिसेंबर 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून सांगलीकडे प्रयाण. सकाळी 12.30 वाजता मंगळवार पेठ मिरज येथे आगमन व दिवंगत विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. दुपारी 1 वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे दिवंगत विवेक कांबळे यांच्या शोक सभेस उपस्थिती. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत बैठक. दुपारी 4 वाजता सांगली येथून पुणे कडे प्रयाण.