आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम

जागतिक एड्स दिन व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

 

 

         सांगली : यावर्षी जागतिक एड्स दिन दि. 1 डिसेंबर व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये  जिल्हा व तालुका स्तरावर प्रभातफेरींचे आयोजन करण्यात आले आहे. एचआयव्ही संसर्गित लोकांना उद्योगाच्या संधी मिळवून देण्यासाठी स्किल इंडिया उपक्रमातून प्रशिक्षण व पतपुरवठा करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध अशासकीय संस्था व देणगीदार यांच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित 18 वर्षे पेक्षा कमी वयोगटातील मुला मुलींना व HB कमी असलेल्या रूग्णांना पोषण आहार देणे व  मुला मुलींच्यासाठी वधु वर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर  YRG Care संस्थेच्या मदतीने एचआयव्ही संसर्गित लोकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचे छोटे माहितीपुस्तक QR code सहीत तयार करून रूग्णांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम यांनी दिली.

            जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमिवर माहिती देताना डॉ. ‍विक्रमसिंह कदम म्हणाले, सध्या सांगली जिल्ह्यामध्ये 17 ICTC, 1 Mobile ICTC व 1 PPP-ICTC च्या माध्यमातुन HIV समुपदेशन व चाचणी सेवा दिली जाते. तसेच HIV शोध मोहिमेसाठी 2 गुप्तरोग तपासणी केंद्रे व 18 रक्तपेढ्यांचे सहकार्य मिळते. जिल्ह्यातील 4 ART सेंटर व 11 लिंक ART सेंटरच्या माध्यमातून 10 हजार 705 HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार दिला जातो. ART औषधोपचारमुळे HIV विषाणूंची संख्या नियंत्रणात राहून होणाऱ्या संधीसाधु आजारांना अटकाव केला जातो, असे ते म्हणाले.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम म्हणाले, Treat all Policy अंतर्गत सर्वच HIV संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. तसेच ज्या रूग्णांच्या तपासणीमध्ये HIV संसर्ग असल्याचे आढळून आले आहे, परंतु अद्याप ते उपचारासाठी ART सेंटर पर्यंत गेले नाहीत अशा सर्वांना गृहभेटी घेऊन त्यांना ART औषधोपचाराचे महत्व पटवून दिले जात आहे.

व या सर्वांना ART औषधोपचारावरती घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. HIV संसर्गित रूग्णांकरिता वेगळी डायलेसीस मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी कार्यान्वीत झाली आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व रूग्णांना पुरेल एवढा औषधसाठा आपणाकडे उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व HIV संसर्गित रूग्णांनी या औषधप्रणालीचा लाभ घेऊन आपले आयुष्य सुखकर करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे.

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!