अरिन, राजदीप,अथर्व,हित, अवनीश आराध्य व अर्णव आघाडीवर ; पायोनियर चषक शालेय बूद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर ः अनिल पाटील
चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज चेस क्लब ने न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. अकरा व सोळा वर्षाखालील स्वतंत्र गटात स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर पायोनियर एनर्जी चे महेश कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष कारंडे, रो. डॉक्टर वैभव ससुरकर, सचिन कलश, नितीन कुलकर्णी, मनीष मारुलकर, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे उपस्थित होते. कोल्हापूर,सांगली, वैभववाडी, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज व वारणानगर येथील नामांकित 144 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर सोळा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित कोल्हापूरचा अरिन कुलकर्णी, इचलकरंजी चा अथर्व तावरे, कोल्हापूरचा राजदीप पाटील व जयसिंगपूरचा हित बलदवा हे चौघेजण चार गुणासह संयुक्त पणे आघाडीवर आहेत.तर अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात इचलकरंजीचा आराध्य ठाकूर देसाई कोल्हापूरचे अवनी जितकर व अर्णव पाटील हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. आदिराज डोईजड वारणानगर ठक्कर कोल्हापूर व अरिजीत पाटील कोल्हापूर हे तिघेजण साडेतीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.